
मुंबई | 24 मार्च 2025 – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना अनावधानाने उच्चारलेल्या एका वाक्यावरून नाभिक समाजाची दिलगिरी व्यक्त केली आहे.
आज विधानसभेत एका महत्त्वाच्या चर्चेदरम्यान त्यांच्या भाषणात एक आक्षेपार्ह वाक्य आले, ज्यावर नाभिक समाजाच्या काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर, जयंत पाटील यांनी तातडीने फेसबुक पोस्टद्वारे माफी मागितली.
त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “आज विधानसभेत बोलताना अनावधानाने माझ्या तोंडून एक वाक्य निघाले. त्याचा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तरीही, मी त्या आक्षेपार्ह वाक्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि ते मागे घेतो.”
या प्रकरणावर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी त्यांच्या क्षमायाचनेचे स्वागत केले आहे, तर काहींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.