धाराशिव – पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होताच शहरातील चिमुकल्या भाविकांनीही उत्साहाने रोजा ठेवण्याची परंपरा पुढे चालवली आहे. अशर शेख (रा. अख्सा चौक, ख्वाजा नगर) यांच्या लहानग्या मुली शुमायला (वय ५ वर्षे) आणि शाझमा शेख (वय ४ वर्षे) यांनी दि. २ मार्च रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला.
या चिमुकल्या रोजेदारांनी मोठ्या श्रद्धेने आणि जिद्दीने उपवास पूर्ण केला. त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी यावेळी त्यांचे कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. लहान वयात धार्मिक परंपरा पाळत रोजा पूर्ण केल्याने परिसरातही त्यांची चर्चा होत आहे.
रमजान महिन्यात लहान मुलांनी ठेवलेला पहिला रोजा घरातील आनंदाचा क्षण असतो. अशा वेळी कुटुंबीय आणि समाजाच्या प्रेमाने या चिमुकल्यांचा हुरूप अधिकच वाढतो.