धाराशिव : संत गाडगे बाबा महाराज जयंती शिंगोली आश्रम शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यानिकेतन आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण, नागनाथ पाटील, रत्नाकर पाटील, चंद्रकांत जाधव, सुर्यकांत बडदापुरे, खंडू पडवळ , दिपक खबोल, प्रशांत राठोड, आदर्श आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार यांनी संत गाडगे महाराज बदल आपले विचार व्यक्त केले. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा तोची साधु ओळखावा, संत तुकाराम महाराज, संत कबीर, संत रोहीदास, संत सावता माळी इत्यादी, महाराष्ट्र ही साधू संताची, शुरवीरांची भूमी आहे. संत गाडगे महाराजांनी सुद्धा लहान पणा पासून अंधश्रद्धा , अनिष्ट रूढी, परंपरा यांचा तीव्र विरोध केला. गावातील शेतकऱ्यांना , कष्टकऱ्यांना लुबाडणूक करणाऱ्यांचा तीव्र विरोध केला. देव दगडात, मंदिरात नसून अनाथ, अपंग लोकांची सेवा करण्यात असून दीन , दलीत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी निवासी आश्रमशाळा त्यांनी उभा केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील यांना संत गाडगे महाराज यांनी सहकार्य , मार्गदर्शन केले. विशाल राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराज यांच्या ग्राम स्वच्छतेचा संदेश दिला. वर्ग व शाळा स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी सांगितले, विदयार्थ्यांनी संत गाडगे महाराज यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून शिक्षण घेऊन जिल्हा अधिकारी, तहसीलदार, डॉक्टर, अभियंता होऊन समाजाची ब देशाची सेवा करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सुधीर कांबळे, शेषेराव राठोड, संजीव कुमार मस्के, संतोष पालम पल्ले, कैलास शानिमे, मल्लिनाथ कोणदे, सचीन राठोड, मदनकुमार आमदापुरे, सुरेखा कांबळे, श्रद्धा सुर्यवंशी, वैशाली शितोळे, ज्योती साने, ज्योती राठोड, बालिका बोयणे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लिंगा आडे , मस्के भिकाजी, गोविंद बनसोडे, रेवा चव्हाण, सचीन अनंतकळवास , सागर सुर्यवंशी, अमोल जगताप व विद्यार्थी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.