विद्यार्थ्यांसाठी ‘स्टुडंट पोलिस कॅडेट’ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

Spread the love

तुळजापूर तालुक्यातील जळकोट (जि. धाराशिव) येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी स्टुडंट पोलिस कॅडेट (SPC) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी बालकांची सुरक्षितता, स्कूल व्हॅनमध्ये बसताना घ्यावयाची काळजी, गुड टच – बॅड टच आणि अमली पदार्थांचे दुष्परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, वाहतूक नियम, हेल्मेटचा वापर आणि वाहन चालविताना घ्यावयाची काळजी याविषयी पोलीस नाईक सारफळे यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना कायद्याची आणि सुरक्षिततेची माहिती देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!