धाराशिव : मागील दोन महिन्यांपासून धाराशिव येडशी आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात एका वाघाच्या उपस्थितीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आता, बार्शी परिसरात हा वाघ दिसल्याची माहिती वनाधिकारी अमोल मुंडे यांनी दिली आहे.
हा वाघ साधारण 200 किलो वजनाचा असल्याचा अंदाज आहे. दोन महिन्यांपासून हा वाघ नेमका कुठे जातो, कसा हालचाल करतो, यावर लक्ष ठेवले जात आहे. मात्र, तो अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, हा वाघ लवकरात लवकर पकडला जावा अशी मागणी होत आहे.
वन विभागाचे पथक या वाघाच्या मागावर असून, लवकरच त्याला पकडले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.