मुंबई | १३ फेब्रुवारी २०२५
मुंबईतील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची पहिली बैठक आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत चालकांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसाठी विविध निर्णय घेण्यात आले.
कल्याणकारी योजनांचे ठळक मुद्दे:
✅ निवृत्ती सन्मान निधी: ६५ वर्षांवरील चालकांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत १०,००० रुपये सन्मान निधी देण्यात येणार.
✅ आरोग्य विमा योजना: सभासद चालकांसाठी जीवन विमा आणि अपंग विमा योजना लवकरच सुरू होणार.
✅ पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना: चालकांच्या मुलांसाठी शिक्षणसंबंधी आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर.
✅ अपघात सहाय्य: कर्तव्य बजावताना झालेल्या दुखापतीसाठी आर्थिक मदत दिली जाणार.
✅ प्रोत्साहनपर बक्षीस योजना: उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सी चालक, संघटना आणि स्टँडसाठी दरवर्षी विशेष बक्षिसे जाहीर केली जाणार.
ही माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केली आहे. या निर्णयामुळे हजारो रिक्षा व टॅक्सीचालकांना थेट लाभ होणार असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा फायदा मिळेल.