धाराशिव दि १२ फेब्रुवारी ( प्रतिनिधी ) एकात्मिक बाल विकास सेवा ग्रामीण प्रकल्प,धाराशिवअंतर्गत अंगणवाडी सेविका पदाच्या ४ आणि अंगणवाडी मदतनीस पदाच्या ३५ पदांसाठी २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका पदासाठी घाटंग्री, गावसूद,ताकविकी व शिवाजीनगर. अंगणवाडी मदतनीस पदासाठी घाटंग्री (तांडा) -२,सोनेगाव,वरवंटी,चिलवडी, ऊतमी,कायापूर,झरेगाव,केकस्थवाडी, शेकापूर,पिंपरी,गावसूद( पारधीवस्ती), बेंबळी,देवळाली,बरमगाव (बु),अनसुर्डा, केशेगाव (कारखाना),बामणी,बामणी (हाडूळवस्ती),खामसवाडी,वाडी बामणी, करजखेडा,भंडारी,पंचगव्हाण,घुगी,चिखली एकनाथवाडी,टाकळी (बे),समुद्रवाणी, राजुरी,वाघोली व सांजा येथील पदांचा समावेश आहे.
तरी २५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज प्रकल्प कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून सादर करावे.असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प,धाराशिवच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी सविता देशमुख यांनी केले आहे.