जिल्हा व्यापारी महासंघाचे विविध मागण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

Spread the love

‘एक कॅमेरा नागरिकांच्या सुरक्षेसाठी’ अभियानांतर्गत सर्व व्यापारी आपापल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावणार

धाराशिव,दि.29-
धाराशिव जिल्ह्यातील व्यापार्‍यांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील व्यापार्‍यांना शांतता कमिटीमध्ये सहभागी करुन घ्यावे, तसेच ‘एक कॅमेरा नागरिकांच्या सुरक्षेसाठी’ अभियानांतर्गत सर्व व्यापारी आपापल्या दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावणार असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी दिली.

धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांसमवेत नुकतीच एक बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्यासमवेत झाली. या बैठकीच्या अनुषंगाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासंदर्भात सूचना करण्यात आली होती. या सूचनेचे व्यापारी महासंघाने स्वागत करुन लवकरच सर्व व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपापल्या दुकानांसमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आश्वासन व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी दिले. धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघ हा गेल्या 50 वर्षांपासून कार्यरत असून सर्व तालुक्यात व्यापारी महासंघाचे संघटन पसरलेले आहे. देशातील सर्व व्यापार्‍यांची शिखर संस्था म्हणून ही संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इन्डस्ट्री अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर व कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या नामांकित संस्थांसोबत धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघ संलग्नित आहे. जिल्ह्यात जबरदस्तीने वर्गणीच्या नावाखाली खंडणी मागणार्‍यांची संख्या जास्त होती. त्याला आळा बसविण्यासाठी व्यापारी महासंघाने पुढाकार घेऊन व्यापार्‍यांची होणारी लूट थांबविली होती. त्याकरिता व्यापारी महासंघाच्या सदस्यांना बोर्डाचे वाटप देखील करण्यात आले होते. याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी बांधवांनी घेतला होता. यापुढेही ही परंपरा कायम सुरु राहण्यासाठी व्यापारी महासंघाला सहकार्य करावे अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.

तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या हस्ते सदस्य नोंदणी बोर्डाचे उदघाटन करण्यात आले. बैठकीस जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव महेश वडगावकर, संघटन सचिव अभिलाष लोमटे, व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष नितीन फंड, अजहर खान, श्याम बजाज, सुभाष शेट्टी, बापू सूर्यवंशी, संपतराव डोके, कपील शर्मा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!