तेरखेडा फटका कारखान्यात भीषण स्फोट – सात जण जखमी!

Spread the love

तेरखेडा फटका कारखान्यात भीषण स्फोट – सात जण जखमी , फोटो AI ,

धाराशिव, ३० जानेवारी: धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील फटका कारखान्यात सोमवारी (दि. २९) भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत पाच महिला आणि दोन पुरुष असे सात कामगार गंभीर भाजले असून, त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. अशी प्राथमिक माहितीनुसार सात जण जखमी आहेत. ( धाराशिव शहरातील मोरया हॉस्पिटल येथे जखमी वर उपचार सुरू आहेत अशी देखील माहिती आहे ) याबाबत अधिक माहिती घेताना प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू असल्याने अजून सखोल माहिती समोर आली नाही.

ही घटना गेल्या एका वर्षात तेरखेडा परिसरातील दुसरी मोठी स्फोटाची दुर्घटना ठरली आहे.  आठ महिन्याआगोदर २४ में २०२४ रोजी एक मोठा स्फोट झाला होता. २९ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या घटनेत स्थानिक नागरिकांच्या मते, शासनाने ठरवून दिलेल्या सुरक्षा नियमावलीचे सर्रास उल्लंघन होत असल्यामुळे अशा घटना घडत आहेत. या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची ठोस अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांना अशा घटनांना समोर जावे लागत आहे अशी माहिती नागरिकांनी दिली आहे.

कारखान्यांमध्ये आवश्यक सुरक्षा उपायांची अमलबजावणी होत नसल्याने कामगारांचे जीव धोक्यात येत आहेत. या गंभीर प्रकरणाकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी देखील फटाका उद्योग मोठा व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत तर सुरक्षा देखील ठेवण्याचे सल्ला देखील दिला होता.

विडियो २९ जानेवारी रेकॉर्ड करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!