धाराशिव शहरात चाकू हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू एक जण गंभीर जखमी, गुन्हा दाखल

Spread the love

धाराशिव : शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-अक्रम अहमद शेख, रा. खाजानगर गल्ली नं 13 धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 07.01.2025 रोजी 21.45 वा. सु. गल्ली नं 13 येथील मदीना मस्जिद समोर मयत नामे- परवेज दगडू बेग, वय 40 वर्षे, रा.खाजानगर,गल्ली नं 7, धाराशिव ता. जि. धाराशिव यांना साजीद मुजावर व नमुद आरोपी यांच्यात चालू अलेले भांडण सोडवण्याचे कारणावरुन चाकुने मारहाण करुन जिवे ठार मारले. तसेच कुमार गोरे हा परवेज याला वाचविण्यास गेला असता नमुद आरोपीने त्यासही जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. मजकुराच्या फिर्यादी नामे-इरशाद दगडू बेग, वय 32 वर्षे, रा.खाजानगर गल्ली नं 07 धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.08.01.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 103, 109अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!