तुळजापूर : सिंदफळ, सावरगाव येथे दि २ नोव्हेंबर रोजी बैठका घेऊन आ. राणाजगजितसिंह पाटील मतदारांशी संवाद साधला यावेळी ठाकरे सरकार जोरदार टीका केली आहे.
तत्कालीन ठाकरे सरकारमुळे आपल्या जिल्ह्यातील अनेक लोकहिताच्या प्रकल्प आणि योजनांना मोठी खीळ बसली होती. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर मागील २४ महिन्यांच्या कालावधीत सतत पाठपुरावा करून जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना आपण पूर्णत्वाच्या दिशेने पुढे नेल्या आहेत. आपल्या हक्काचे पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णेचे पाणी डिसेंबर अखेरपर्यंत तुळजाभवानी देवीच्या चरणी दाखल होत आहे. त्यातून १४ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आपल्या गावांना याचा लाभ होणार असून शेतीशी निगडीत रोजगार आणि अर्थकारणालाही मोठे बळ मिळणार आहे. त्यामुळे रोजगारासाठी विस्थापित होणार्या तरूणांना आपल्या गावातच चांगल्या संधी उपलब्ध होतील. विकासाची दृष्टि ठेवून लोकहिताच्या कृतीने केलेल्या प्रयत्नांना महायुती सरकारने मोठे बळ दिले. त्यामुळे जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले हे सगळे प्रकल्प आणि योजना आता मोठ्या वेगात पूर्णत्वाकडे जात असल्याने त्याचे मोठे समाधान आहे. आपल्या जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हाती घेतलेले प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहेत आणि उर्वरित प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्य आणि सोबतीची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून विजयी करावे. तुळजापूरच्या सर्वांगीण`विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असे मत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा गटप्रमुख व सांगवी (मार्डी) चे बुथप्रमुख मेघराज बागल, सारोळा ग्रा.पं उपसरपंच आकाश म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त आ. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. गावातील दत्तुभाऊ व्यवहारे यांनी वयाचे १०४ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचाही सत्कार आ.पाटील यांनी केला.