Dharashiv : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा दि. 12/11/2024 रोजी धाराशिव व सोलापूर जिल्हयातील विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार दौरा आयोजित केला आहे. धाराशिव शहरात आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्व राजकीयाचे नजरा लागल्या आहेत.
दि. 12/11/2024 रोजी सकाळी 9.30 मी. मुंबईहून खाजगी विमानाने लातूर येथे सकाळी 10.00 वा. लातूर विमानतळ येथून कासार शिरसी येथे हेलीकॉप्टरने आगमण सकाळी 11.00 वा. औसा निलंगा विधानसभेचे उमेदवार दिनकरराव माने यांची प्रचार सभा.
दुपारी 12.00 वा. कासारशिरसी येथून हेलीकॉप्टरने लोहारा येथील हेलीपॅडवर आगमण.दुपारी 01.00 वा. उमरगा लोहारा विधानसभेचे महाविकास आघाडीचे प्रविण स्वामी यांची प्रचारसभा स्थळ शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय लोहारा येथून सोलापूरकडे हेलीकॉप्टरने प्रयाण. दुपारी 03.45 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमण विमानतळ ते हॉटेल सरोवर गाडीने प्रयाण. सायं. 04.45 वा. हॉटेल सरोवर येथून बार्शीकडे गाडीने प्रयाण. सायं. 05.00 वा. शिवसेनेचे बार्शी विधानसभेचे उमेदवार माजी आ.दिलीप सोपल यांची प्रचारसभा स्थळ गांधी चौक मैदान बार्शी. सायं. 06.00 वा. बार्शी येथून धाराशिव येथे गाडीने प्रयाण. सायं. 07.00 वा. धाराशिव कळंबचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास पाटील यांची प्रचार सभा स्थळ कन्या प्रशाला धाराशिव. सायं. 08.00 वा. धाराशिव येथून हॉटेल सरोवर सोलापूरकडे प्रयाण. रात्री 09.00 वा. हॉटेल सरोवर येथे मुक्काम असणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.