सिध्दीविनायक चे व्यवस्थापन कौतुकास्पद – मा.आ.सुजितसिंह ठाकूर ,

Spread the love

सिध्दीविनायक चे व्यवस्थापन कौतुकास्पद – मा.आ.सुजितसिंह ठाकूर ,

श्री सिध्दीविनायक परिवारातील कारखान्यांचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न

श्री सिध्दीविनायक परिवारातील दोन्ही कारखान्यांचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

श्री सिध्दीविनायक परिवारातील श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा लि व श्री सिध्दीविनायक अॅग्रीटेक इंडस्ट्रीज लि हे दोन्ही कारखाने येत्या गाळप हंगामासाठी सज्ज झाले आहेत. या दोन्ही कारखान्यांचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आज विधान परिषदेचे माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आपल्या प्रास्ताविक पर भाषणामध्ये परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी येता गळीत हंगाम कसा असेल याबद्दल माहिती दिली.

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या कारखान्याला ऊस घालण्याबद्दल आवाहन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले तसेच दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा श्री सिध्दीविनायक परिवार हा मराठवाड्यासह महाराष्ट्रात नाव लौकिक करेल असे पण त्यांनी सांगीतले.

या कार्यक्रमास खामसवाडी गावचे सरपंच अमोल पाटील, अशोक शेळके, तेरणा कारखान्याचे माजी संचालक दिलीप पाटील, ग्राम पंचायत सदस्य दयानंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पाटील, अॅड. नितीन भोसले, बालाजी कोरे, गणेश कामटे, दिनेश कुलकर्णी, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, धनंजय गुंड, हनुमंत कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. प्रतिक देवळे यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!