निष्ठावंत आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्यासाठी एकत्र या  – श्याम जाधव यांचे आवाहन

Spread the love

धाराशिव ता. 26: एकनिष्ठ तसेच कोणत्याही लोभाला बळी न पडता लोककल्यानाचा ध्यास घेतलेले आमदार कैलास पाटील यांचा उमेदवारी अर्ज ( ता.28 ) रोजी भरायचा आहे. महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी उपस्थिती लावावी असे आवाहन पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनी केले आहे.
गेल्या कित्येक वर्षात या मतदार संघात एक मोठी संधी चालून आली आहे. सामान्य घरातून आलेले एक नेतृत्व  पुन्हा एकदा आमदार होणार असल्यामुळे हे आपल्या साठी नक्कीच भूषणावह आहे. या पदाचा जनसामान्य जनतेलाच गेल्या पाच वर्षात फायदा झाला आहेच पुढेही होणार आहे असे मत श्री. जाधव यांनी व्यक्त केले. कोरोना काळात म्हणजे अंत्यत कठीण काळात ज्या व्यक्तीने आपल्या सामान्य जनतेची काळजी घेतली नव्हे एक सुसज्ज शासकीय महाविद्यालय उभा केले. त्याच व्यक्तीसाठी जेव्हा खोके व मंत्रीपदाच्या पायघडया टाकल्या त्यावेळी या नेत्यांकडून स्वाभिमानी बाणा दाखवत जनतेशी इमान राखण्याचं काम केल. त्याच व्यक्तीच्या निष्टेची दखल पक्षानेही घेत पहिल्याच यादीत त्यांचं नाव घेत त्यांचा सन्मान केला.आता जबाबदारी आपल्यावर आहे ज्या आमदारांनी खोके व मंत्रीपदाला लाथ मारली त्या प्रामाणिक माणसाला साथ देण्याची वेळ आली आहे. सामान्य घरातील हक्काचा आमदार यांना साथ देण्यासाठी आपण सर्वानी सोमवारी (ता. 28) रोजी मोठया संख्येनं उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.


धाराशिव/ उस्मानाबाद-कळंब विधानसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व  महाविकास आघाडीचे
अधिकृत उमेदवार श्री कैलास पाटील यांची भव्य उमेदवारी अर्ज नामांकन रॅली दिनांक: २८ ऑक्टोबर २०२४ सोमवार,सकाळी १०:०० वाजता अण्णाभाऊ साठे चौक-धारासूर मर्दिनी मंदिर- हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा – नेहरू चौक-काळा मारुती मंदिर-संत गाडगे बाबा चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय अशी असणार आहे. हजारोंच्या संख्येने सहभागी होऊया ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊया असे आवाहन श्याम जाधव यांनी केलं आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!