धाराशिव :- तक्रारदार पुरुष, वय-37 वर्षे. आरोपी लोकसेवक – मई बळीराम खांडेकर , वय-34 वर्षे,
पद- कनिष्ठ सहाय्यक, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय,ता.तुळजापूर जि. धाराशीव. ( वर्ग-०३)
आरोपी लोकसेवक – श्रीमती सोनाली संदीप कदम , वय-28वर्षे, पद- अंगणवाडी सेविका, मौजे चिंचोली, तालुका तुळजापूर , धाराशिव. रा. चिंचोली, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव.
लाच मागणी रक्कम – 15,000/- रुपये लाच रक्कमेची मागणी करुन तडजोड अंती 10,000/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. लाच पडताळणी दिनांक -18/10/2024 लाच स्वीकारली दिनांक –
18/10/2024 लाच स्विकारली रक्कम – 10,000/- रुपये आहे अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभाग धाराशिव यांनी दिली आहे.
कारण-यातील आलोसे क्रमांक 01 व आलोसे क्रमांक 02 यांनी यातील तक्रारदार यांचे पत्नीचे मौजे चिंचोली, तालुका-तुळजापुर येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती पत्रावर वरिष्ठांची सही घेऊन ऑर्डर देण्यासाठी पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार यांचेकडे 15,000 /- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10,000/- रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य करुन यातील आलोसे क्रमांक 01 यांनी पंचासमक्ष सदरची लाच रक्कम स्वतः स्विकारली असता आलोसे क्रमांक 1) व आलोसे क्रमांक 2) याना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे तुळजापूर , जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. अशी माहिती देण्यात आली आहे
सापळा अधिकारी-
श्री. विकास राठोड, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट. मो.नं.99222 07499. सापळा पर्यवेक्षण अधिकारी-
श्री. सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट. मो.नं. 9594658686.
मार्गदर्शक अधिकारी श्री संदीप आटोळे
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर.
मो.नं.9923023361 , श्री. मुकुंद आघाव
अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर
मो.नं. 9881460104 सापळा पथक – पोलीस- अमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, जाकीर काझी व चालक दत्तात्रय करडे यांनी केली आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो, धाराशिव
@ दुरध्वनी क्रं. 02472-222879
@ टोल फ्रि क्रं. 1064