धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघ असून सध्या पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. औसा , बार्शी, भूम-परंडा-वाशी , उमरगा-लोहारा , तुळजापूर या मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. तर एक मतदार संघ धाराशिव-कळंब ( उस्मानाबाद) महाविकास आघाडी कडे आहे. 15 तारखेपासून आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात भेटीगाठी घेण्याचे कार्यक्रम वाढवले असले तरी मात्र आमदारावर जनता नाराज असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोण साडी वाटप करत आहे. तर कोण खते बी-बियाणे बारदाना , साखर , कोण गुड पावडर , तर कोण सभा घेत आज पर्यंत केलेल्या कामाचा अहवाल सादर करत आहे. तसेच इच्छुकांनी आपल्या कामाचे अहवाल सादर करत मी पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अस्पष्टपणे अपक्ष उभा राहण्याचे संकेत दिले आहेत. प्रत्येक मतदार संघात सात ते आठ उमेदवार उभे राहू शकतात सध्या अशी परिस्थिती आहे.
चालू आमदारांनी आपला मतदारसंघातील रोजगार निमित्ताने स्थलांतर झालेल्या मतदारांच्या दुसरा जिल्ह्यात जाऊन भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. चालू आमदारांनी आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेला कामांची मोठ्या प्रमाणात उद्घाटन करत एका प्रकारची निवडणूक पूर्व जाहिरात सुरू केली आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात पिण्याचे पाणी , बेरोजगार , सतत दुष्काळ , अतिवृष्टी , रस्ते , अशा अनेक सुविधा पासून नागरिक वंचित आहेत. अनेक भागांमध्ये आजही आठ दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. तरुणांच्या हाताला रोजगार नाही , शेतकऱ्यांना अपेक्षित असणाऱ्या सुविधा उपलब्ध नाहीत , जिल्हा बँक अडचणीत आहे , शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत , जिल्ह्यात विजेची अडचण आहे , औसा आणि बार्शी मतदारसंघात काही प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यातील चार मतदार संघात उदासीनता असल्याने नागरिकांमध्ये आपल्या तरुण अनेक सोयी सुविधा पासून वंचित असल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर नेहमी टीका करतात मात्र देश स्वतंत्र झाल्यापासून झालेले विकास कामे अनेक आहेत तर न झालेली विकास कामे पण आहेत त्यामुळे विरोधक व सत्ताधारी आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात सगळ्यांनी सत्ता भोगली आहे. मात्र एकमेकाकडे बोट दाखवण्यास कोणी कमी पडत नाही. जिल्ह्यातील जनता हुशार झाली आहे.
यावेळी आरक्षणाचा विषय पुढे आल्याने जनतेला विकासाचा विसर पडला असला तरी योग्य वेळी योग्य मार्ग निवडणार ही महाराष्ट्रातील परंपरा राहिली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात सहा मतदारसंघात 52 उमेदवार होतात की काय अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सध्या तर प्रत्येक पक्षाने आपला एक उमेदवार तयार ठेवला आहे तर त्याच पक्षात अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर बंडखोरी देखील करतील अशी परिस्थिती आहे. जास्त उमेदवार मैदानात उतरल्यानंतर कोणाची गोची करणार हे पाहणं देखील महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रत्येक जण आपली बाजू योग्य आहे असे दाखवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. तर कोणी न झालेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन जनतेला दाखवून देण्याचे प्रयत्न करत आहेत, तर काही ठिकाणी विकास कामांच्या होणाऱ्या कामांना अडथळा निर्माण करून श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. श्रेय वादाच्या लढाईमध्ये सर्वसामान्यांचे मात्र नुकसान देखील होत आहे. कोण अभ्यास करून आले आहेत तर कोण अभ्यास करून या म्हणत आहेत. तर कोण ओरडू ओरडू मी सांगतो ते सत्य आहे असे देखील म्हणत आहेत. या सर्व राजकीय लोकांना जनतेची दिशाभूल करण्यात यश येणार आहे का हेच पाहणं या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.
जनतेसमोर जरी विरोधक आणि सत्ताधारी असले तरी अनेक जण एकमेकांशी आपले हितसंबंध जोपासतात व दाखवताना कार्यकर्त्यांमध्ये नेहमी विरोध आहे असे दर्शवतात. कार्यकर्त्यांनी योग्य निर्णय घेऊन जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पाऊले उचलायला हवीत.
अग्रलेखाच्या माध्यमातून आम्ही नेहमी आपल्यासमोर सत्य मांडत राहू आपली साथ आमच्या सोबत नेहमी अशीच असू द्या..
संपादक – सलीम पठाण , साप्ताहिक ‘अंतरसंवाद न्यूज’