धाराशिव :
एन.व्हि.पी शुगर प्रा.लि.जागजी येथिल पहिल्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमाचा होम पूजा कारखान्याचे चेअरमन मा.श्री.नानासाहेब पाटील साहेब व सुविद्य पत्नी सौ.अमृता ताई यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.
बॉयलर अग्नी प्रदीपन कारखान्याचे मार्गदर्शक मा.श्री.आप्पासाहेब पाटील साहेब, चेअरमन मा.श्री.नानासाहेब पाटील, कार्यकारी संचालक सौ.अमृता ताई पाटील, अक्षय पाटील, कृष्णा पाटील, पार्थ पाटील, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, मे.चिफ केमिस्ट उमेश बिक्कड, पॅन इंचार्ज राजेंद्र शिंदे, बॉयलर अटेंडन अजय गाडे, चिफ अकाउंटंट निलेश कदम, टर्बाईन अटेंडन परमेश्वर वीर, सुरक्षा अधिकारी मेजर चंद्रकांत पवार आदी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रारंभी कारखान्याचे चेअरमन श्री.पाटील साहेब यांनी सर्व कर्मचाऱ्यांना विजयादशमी च्या शुभेच्छा दिल्या तसेच या वर्षीचा गळीत हंगाम पुर्ण क्षमतेने चालवणार असुन त्या दुष्टीने सर्व कामे प्रगतीपथावर घेऊन पुर्ण करण्याच्या सूचना केल्या.
या कार्यक्रमास जागजी चे सरपंच व्यंकट बंडगर, माजी सरपंच भिमराव सावंत, कृष्णा सावंत, विक्रम देशमुख, सुरेश अण्णा सावंत, पत्रकार दिपक सावंत, लेबर ऑफिसर दत्तात्रय गायकवाड, विजय वाघे, प्रविण पाटील, सुधाकर खोत, राहुल जावळे, ढोकळे मास्तर, सावतर मास्तर, परचेस अधिकारी रवि जोगदंड, सागर शिंदे, पांडुरंग कावळे, विष्णू खोत,उपाध्ये मास्तर, वैभव शिंदे, कैलास धाबेकर, संभाजी चोरमले, कौस्तुभ शिंदे, सह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.