धाराशिव : तक्रारदार- पुरुष, वय-43 वर्षे. तक्रारीवरून प्रतिबंध विभागाने कारवाई केली असून आरोपी लोकसेवक दयानंद पांडुरंग चव्हाण, वय-45 वर्षे, पद-मुख्य लिपीक, जिल्हा उप-निबंधक सहकारी संस्था कार्यालय, धाराशीव.
रा. ठि. बार्शी रोड, धाराशीव मुळ पत्ता- राजे शिवाजी नगर, पाखर सांगवी, बार्शी रोड, लातुर. ( वर्ग-०३) लाच मागणी रक्कम – 50,000/- रुपये लाच रक्कमेची मागणी करुन तडजोड अंती 25,000/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिली आहे.
कारण-यातील तक्रारदार हे कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सचिव आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजुरी मिळणेकरीता कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंबचे सभापती यांचे स्वाक्षरीने जिल्हा उप-निबंधक सहकारी संस्था कार्यालय, धाराशीव येथे अर्ज केला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब येथे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजुरी आदेश देण्याकरीता यातील आलोसे दयानंद चव्हाण याने तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 50,000/- रुपये लाच रकमेची मागणी करुन तडजोडीअंती 25,000/- रुपये स्विकारण्याचे मान्य केले व सदरची लाच रक्कम ही पंचासमक्ष स्वतः स्विकारली असता आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे आनंदनगर, जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
लाच पडताळणी दिनांक – 01/10/2024 लाच स्वीकारली दिनांक – 01/10/2024 लाच स्विकारली रक्कम – 25,000/- रुपये आहे अशी माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिली आहे
सापळा अधिकारी-
श्री.नानासाहेब कदम,
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट.
मो.नं.99222 07499.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी-
श्री. सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट.
मो.नं. 9594658686.
मार्गदर्शक अधिकारी
श्री संदीप आटोळे
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर.
मो.नं.9923023361
श्री. मुकुंद आघाव
अपर पोलीस अधीक्षक,
ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर
मो.नं. 9881460104
सापळा पथक-
पोलीस अमलदार सिध्देश्वर तावसकर, आशीष पाटील, नागेश शेरकर.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, धाराशिव
दुरध्वनी क्रं. 02472-222879
टोल फ्रि क्रं. 1064