धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे तू गावाचा पुढारी आहे का थांब तुझे पुढारपण काढतोय असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण झाली आहे याबाबत नळदुर्ग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती धाराशिव पोलीस माहिती विभागाकडून देण्यात आली आहे .
आरोपी नामे- रंगनाथ संदीपान दबडे, विजय राजेंद्र जाधव, कालीदास बलभिम जाधव, अक्षय नेताजी मारेकर, आकाश लक्ष्मण बनसोडे, दिपक प्रकाश बनसोडे, प्रशांत सुधाकर दबडे, राहुल महेश देशमुख, नागनाथ बाबु राघुजी सर्व रा. लोहगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 17.09.2024 रोजी 10.30 वा. सु. मारुती मंदीराच्या पाठीमागे मठाच्या मोकळ्या जागेत लोहगाव येथे फिर्यादी नामे-सातलिंग मल्लीनाथ पाटील, वय 47 वर्षे, रा. लोहगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून तु गावचा पुढारी आहे का थांब तुझे पुढारपण काढतो असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सळई, लोखंडी दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा पुतण्या हा भांडण सोडवण्यास आला आसता नमुद आरोपींनी त्यासही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सातलिंग पाटील यांनी दि.20.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(2), 118(1), 115(2),189(2), 191(2),191(3), 190, 352, 351(2) अन्वये नळदुर्ग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे.