आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचा परंडा तालुक्यात गाव संवाद दौरा
Dharashiv :
गुडी पाडव्याला उजणी धरणाचे पाणी सिनाकोळगाव धरणात आनणार असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी परंडा तालूक्यातील चिंचपूर (बु) येथे गाव संवाद दौऱ्यात दरम्यान बोलताना केले. दि १० सप्टेबर रोजी प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी परंडा तालूक्यातील शेळगाव, धोत्री, सक्करवाडी, पांढरेवाडी, लंगोटवाडी, चिंचपूर, ताकमोडवाडी, जेकटेवाडी, देवगाव खुर्द, गोसावीवाडी, कुक्कडगाव, खंडेश्वरवाडी या गावांत संवाद दौरा केला.
या वेळी चिंचपूर येथील मंदीरासमोर सभा मंडप बांधकामासाठी २५ लाख रुपये निधी देण्याची घोषणा प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केली. तसेच विविध विकास कामासाठी निधी कमी पडल्यास स्वखर्चाने विकास कामे करून देणार असल्याची घोषणा यावेळी केली. तसेच पुढे बोलताना मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत म्हणाले की उजणीचे पाणी आल्यावर तलावा पासुन ५ ते १० किलोमीटर अतंरावर लांब शेती असलेल्या शेतकऱ्यासाठी उपसा सिंचन समित्या स्थापण करून पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवणार व पाणी आल्यापासुन पाच वर्षापर्यंत वीजबिल भैरवनाथ साखर कारखाना भरेल अशी शेतकरी हिताची मोठी घोषणा यावेळी आरोग्य आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी केली.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, मा.जि.उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत, जिल्हा शिवसेना जिल्हा समन्वयक गौतम लटके सर , जेष्ठ नेते अॅड. सुभाष मोरे, शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे, चिंचपुर ग्रामपंचायतीचे सरंपच डॉ. महेश देवकर, पंचायत समीतीचे माजी देवकर, आनिल सरपंच महादेव देवकर, प्रदिप पाटील, दत्ता कुलकर्णी, गणेश सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.