पंधरा हजार लाचेची मागणी करून दहा हजार रुपये स्वीकारले, मंडळ अधिकारी अटकेत, धाराशिव अँन्टी करप्शन ब्युरोची कारवाई
धाराशिव : तक्रारदार- पुरुष, वय-33 वर्षे यांच्या तक्रारीवरून
आरोपी लोकसेवक – 1) जयंत श्रीपतराव गायकवाड, वय-47 वर्षे, पद-मंडळ अधिकारी नेमणूक- नळदुर्ग, तां तुळजापुर, जि. धाराशीव. राठी. रुम नं. २२, ओंकार नगर, उमरगा, जि. धाराशीव. ( वर्ग-०३) , बाळासाहेब प्रकाश पवार, वय-45 वर्षे, पद-महसुल सहाय्यक, तहसिल कार्यालय, तुळजापुर. रा.ठि. कुंभारी ता. जि. तुळजापुर, जि. धाराशीव.( वर्ग-०३) लाच मागणी रक्कम –
15,000/- रुपये लाच रक्कमेची मागणी करुन तडजोड अंती 10,000/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. लाच पडताळणी दिनांक – 03/09/2024 , लाच स्वीकारली दिनांक – 03/09/2024 , लाच स्विकारली रक्कम – 10,000/- रुपये ,
कारण-यातील तक्रारदार यांचे मालकीचे शेतीतील 20 गुंठे जमीनीचे खोदकाम करुन त्यातील मुरुम व माती आजुबाजुला पसरवून सपाटीकरण करण्यासाठी किरकोळ रॅायल्टी भरुन घेवुन कोणतीही कारवाई न करण्यासाठी आलोसे क्रमांक 01 याने पंचासमक्ष 15,000/- रुपये लाच रकमेची मागणी करुन तडजोडीअंती 10,000/- रुपये स्विकारण्याचे मान्य केले व सदरची लाच रक्कम ही आलोसे क्रमांक 02 याने आलोसे क्र. 01 यांचे सांगण्यावरून पंचासमक्ष स्विकारले असता दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असुन पोलीस ठाणे तुळजापुर, जि धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा अधिकारी-
श्री. सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट.
मो.नं. 9594658686. , मार्गदर्शक अधिकारी* –
श्री संदीप आटोळे
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर.
मो.नं.9923023361 , श्री. मुकुंद आघाव
अपर पोलीस अधीक्षक,
ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर
मो.नं. 9881460104
सापळा पथक-
पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर या पथकाने कारवाई केली आहे.
================
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
अँन्टी करप्शन ब्युरो, धाराशिव
दुरध्वनी क्रं. 02472-222879
टोल फ्रि क्रं. 1064