Dharashiv – Osmanabad
धाराशिव शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली आहे.. रस्ते निकृष्ट असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यांच्या कामासाठी विविध योजनांमधून निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.. तरीही रस्त्यांची कामे करण्यास सुरुवात झालेली नाही.. मंजूर असलेल्या कामांना प्राधान्य देऊन तात्काळ पूर्ण करावीत, विहित वेळेत कामे पूर्ण न केल्यास संबंधित यंत्रणेवर कारवाई करावी अशा सूचना आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी , कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण, मुख्याधिकारी वसुधा फड, उपविभागीय अभियंता श्री. मोरे, गटनेते सोमनाथ गुरव, पंकज पाटील, केदार साळुंके आदी उपस्थित होते. अशी माहिती आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी दिली आहे.