Dharashiv :
डॉ. वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस,धाराशिव येथील आर.पी कॉलेज ऑफ फार्मसी व बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ऑफ इंडिया (BDMAI) यांच्या संयुक्त विद्यमाने,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. हा कॅम्पस ड्राईव्ह हैदराबाद स्थित, द फार्मा पाठशाला, जे की, प्रधानमंत्री कौशल्य व राष्ट्रीय कौशल्य उद्योजकता विकास आणि ट्रेनिंग सेंटर म्हणून प्रसिद्ध आहे. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले. या कॅम्पस ड्राइव्ह मध्ये राज्यभरातून जवळपास 200 विद्यार्थ्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी भविष्यामध्ये अशा जास्तीत जास्त कॅम्पस ड्राईव्हच्या आयोजनाचा मानस व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसी व द फार्मा पाठशाला या ट्रेनिंग सेंटर यांच्या दरम्यान एक संयुक्त करार ( MoU) करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस ड्राईव्ह च्या आयोजनातून औषध निर्माण क्षेत्रातील वेगवेगळ्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. या संयुक्त करारा वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी व फार्मा पाठशाला चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. पी.व्ही व्ही सत्यनारायणा व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या कॅम्पस ड्राईव्ह चे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रा. विजय सुतार प्रा. निशिनंदन शिंदे प्रा. असलम तांबोळी यांनी परिश्रम घेतले.