उस्मानाबाद नामांतर शुक्रवार 2 आगस्ट 2024 रोजी मा. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!
धाराशिव : उस्मानाबाद जिल्हा नामांतर विरोधी कृती समितीतर्फे मा. सर्वोच्च न्यायालयात मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध आव्हान याचिका दि. 5 जुलै रोजी दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शहराची व जिल्ह्याची अशा दोन याचिका दाखल करण्यात आले आहेत शहराच्या याचिकेबाबत शुक्रवार 2 आगस्ट 2024 रोजी सुनावणी होणार आहे अशी माहिती याचिका करते मसुद शेख यांनी दिली आहे.
शहरातील शेख मसूद इस्माईल , कादरखाॅन पठाण, खलील गफुर कुरेशी,अय्याज हरुन शेख (बबलू) , खलील साहेब सय्यद, असदखाॅन अश्रफखाॅन पठाण, इस्माईल बाबासाहेब शेख, निजामोद्दीन बडेमिया मुजावर (बाबा), वाजिदखाॅन हमिदखाॅन पठाण, बीलाल सलाऊद्दीन तांबोळी, अतिक अहेमद अ.बशीर शेख, सामियोद्दीन गुलाम सिद्दीक मशायक , इद्रिस हसन बशीर पीरजादे ( अफरोज) , इम्तियाज हसणं बागवान, इलियास रहमुतुल्ला पिरजादे, , काझी सय्यद कलीमोद्दीन इजहारोद्दीश ( एजाज) , इब्राहिम बाबा शेख , शब्बीर गवंडी , असेफ अली जमादार ई.नी उस्मानाबाद नामांतरण विषयी चालू असलेल्या लढायला मा. सर्वोच्च न्यायालयात यासाठी अपील दाखल केले आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयात अँड अग्रवाल यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. अँड सतीश तळेकर व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील याबाबत उस्मानाबाद नामांतरणाची बाजू मांडणार आहेत. अशी माहिती नामांतरण विरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.