जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांच्यावतीने आर.पी.औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये विधी साक्षरता शिबिर संपन्न

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी-डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, गडपाटी, आळणी, येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद व आर.पी.औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने, विधी साक्षरता शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद चे सचिव व दिवाणी न्यायाधीश ॲड. वसंत यादव, ॲड.कस्पटे,ॲड.गाडे व ॲड. पाथुरकर त्या सोबतच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.गाडे यांनी केले.ॲड.कस्पटे यांनी पोक्सो ऍक्ट 2012 विषयी विस्तृत असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यासोबतच ॲड.
पाथुरकर यांनी राईट टू एज्युकेशन ॲक्ट ( RTE act 2009) या विषयी मार्गदर्शन केले तसेच या कायद्याची भारतासारख्या देशांमध्ये कशी गरज आहे याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ॲड.वसंत यादव यांनी राष्ट्रीय विधी प्राधिकरणाचे महत्त्व व भारतातील गोरगरीब व सामान्य माणसासाठी विधी प्राधिकरणाचे कार्य याविषयी मार्गदर्शन केले. त्यासोबतच त्यांनी औषध निर्माण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी देखील शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेख गाझी यांनी संस्थेची रॅगिंग, किंवा मुलींच्या छेडछाडीच्या बाबतीत संस्थेची झिरो टॉलरन्स पॉलिसी कशी अवलंबली आहे हे सांगितले त्या सोबतच त्यांनी डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलात मुलींच्या सुरक्षितते विषयी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असेही नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. राम लोमटे केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!