धाराशिव : धाराशिव कृषी विभाग अँक्शन मोड मध्ये आलेला असुन जिल्हाभरात विविध ठिकाणी जाऊन बोगस खताच्या पोते व्रिकी करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. मागणी आठ दिवसांत दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. 19 जुलै 2024 रोजी 30 टन (598 बॅग) डीएपी व 20: :20:0 जप्त करून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आज 26 जुलै रोजी साहेबराव दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून धाराशिव जिल्ह्यामध्ये बोगस NPK 10:26:26 (400 पोते एकूण रक्कम 5,88,000/-)निदर्शनास आल्यामुळे आज दि 26 जुलै 2024 पोलीस ठाणे तामलवाडी तालुका तुळजापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरील गुन्ह्याची फिर्याद प्रवीण पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, धाराशिव यांनी दिली. सोबत मोहीम अधिकारी डी ए गरगडे, तालुका कृषि अधिकारी अवधूत मुळे, पंचायत समिती तुळजापूर कार्यालयाचे कृषी अधिकारी सतीश पिंपरकर होते. याकामी प्रवीण विठ्ठल भोर तंत्र अधिकारी गु नि लातूर यांनी सखोल मार्गदर्शन व नियोजन केले. अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.