धाराशिव: मोदींजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधांची घोषणा केली आहे. महिलांच्या विकासासाठी ३ लाख कोटींची तरतूद. ग्रामीण विकासासाठी २.६६ लाख कोटींची तरतूद.रोजगार आणि कौशल्यविकासाशी संबंधित ५ योजनांसाठी केंद्र सरकारने पेटारा उघडला आहे. या योजनांसाठी दोन लाख कोटींची तरतूद याचा ४ कोटी युवकांना फायदा होणार आहे. या सर्व तरतुदी पाहता अर्थसंकल्पात महिला, तरुण, गरीब आणि अन्नदाता यांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे हे स्पष्ट होते. पाणी,वीज,रस्ते यासारख्या पायाभूत सुविधांसाठी ११ लक्ष ११ हजार कोटींची तरतूद निर्णय घेत हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा रोडमॅप आहे असंच म्हणावं लागेल. अशी प्रतिक्रिया आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पात धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गासाठी रु. 225 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही आपल्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. त्यामुळे आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.
– आ.राणाजगजितसिंह पाटील अशी देखील माहिती आ. पाटील यांनी दिली आहे.