धाराशिव : दिनांक 23 जुलै, मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024-25 चा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला आहे. शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि शेतीबद्दल महत्त्वाच्या घोषणा केल्या.
विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धीर व दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पात शेती आणि शेतीपुरक व्यवसायासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या माध्यमातून कृषी विकास व्हावा आणि महत्त्वाचं म्हणजे या निधीतून डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाणार आहे. शेत जमिनीचं सर्व्हेक्षण आणि मातीची तपासणी यावर जास्त खर्च केला जाईल. देशभरातील प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीला एक खास ‘भू-आधार’ नंबर दिला जाणार आहे. पुढील काही वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
देशांतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी 3 टक्के व्याजदराने 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. पंतप्रधान मुद्रा योजना या योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. याआधी MSME क्षेत्रासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जात होतं. ते आता 20 लाख रुपये करण्यात आलं आहे. 1000 इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अपग्रेड करून तेथील अभ्यासक्रम आधुनिक होणार आहे.
नवीन रोजगारासाठी 2 लाख कोटी रुपये बजेट दिले आहे. महिलांना रोजगार प्रोत्साहन देण्यासाठी वर्किंग वुमेन हॉस्टेल पाळणाघरांची स्थापना करणारं व महिलांचा नोकऱ्यांमध्ये सहभाग वाढवण्यासाठी प्राधान्य देणारा तसेच महिलांमधील कौशल्य विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे.
वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर मध्ये बदल करण्याची घोषणा केली. आहे अशी प्रतिक्रिया डॉ.सौ.सरोजनीताई संतोष राऊत , प्रदेश सहसंयोजक – भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र , जिल्हा उपाध्यक्ष – भारतीय जनता पार्टी, धाराशिव यांनी दिली आहे.
सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारा अर्थसंकल्प – डॉ.सौ.सरोजनीताई संतोष राऊत
Leave a comment
Leave a comment