धाराशिव – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात लोकशाहीच्या उत्सवाला म्हणजेच निवडणुकीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी पहिला अर्ज भूम च्या आर्यनराजे शिंदे यांनी घेतला आहे. दोन अर्ज घेतले आहेत. राष्ट्रीय समाज दल (आर) या पक्षाच्या वतीने त्यांनी हा अर्ज घेतला असून ते लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन नंबरला डॉ नवनाथ विश्वनाथ दुधाळ यांनी ४ अर्ज घेतले आहेत. विश्व शक्ती पार्टी च्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार असण्याची माहिती दुधाळ यांनी दिली आहे.
अर्ज विक्री सुरू झाल्यापासून पहिल्या तासात सहा अर्जांची विक्री झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत आणखी संख्या वाढू शकते.
लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण माहिती
19 लाख 75 हजार मतदार निवडून देणार धाराशिव लोकसभेचा खासदार , 2139 मतदान केंद्र, 78 तृतीयपंथी मतदार
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी, दुरूस्ती व विविध कारणांनी नावे वगळण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. लोकसभा मतदारसंघात 19 लाख 74 हजार मतदार
धाराशिव लोकसभा मतदार संघात येणार्या धाराशिव जिल्ह्यातील चार, सोलापूर व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक, अशा एकूण सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. आता हे मतदार धाराशिव लोकसभेचा खासदार निवडून देणार आहेत.
या लोकसभा मतदारसंघात आजवर 19 लाख 74 हजार 445 मतदारांचा समावेश आहे. यात 10 लाख 43 हजार 172 पुरूष, नऊ लाख 31 हजार 195 महिला तर 78 तृतीयपंथीयांचा समावेश आहे.
लोकसभेसाठी दोन हजार 139 मतदान केंद्र
धाराशिव लोकसभा मतदारसंघात 2139 मतदान केंद्र आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 1503 मतदान केंद्र आहेत.
5 जानेवारीपर्यंत या प्रक्रियेनुसार जिल्ह्यात 25 हजार नवीन मतदार वाढले आहेत. तर मृत्यू, स्थलांतर व अन्य कारणांनी 63 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात आजरोजी 13 लाख 66 हजार 722 मतदार आहेत. यात 38 तृतीयपंथी मतदार आहेत.
जिल्ह्यातील धाराशिव-कळंब विधानसभा मतदार संघात पाच हजार 308 मतदार वाढले आहेत. यात एक हजार 854 पुरूष, तीन हजार 447 महिला व सात तृतीयपंथीयांचा समावेश आहे. या मतदार संघात एकूण मतदारसंख्या तीन लाख 61 हजार 458 इतकी झाली आहे.
उमरगा-लोहारा राखीव विधानसभा मतदारसंघात पाच हजार 813 मतदार वाढले आहेत. यात दोन हजार 584 पुरूष, तीन हजार 224 महिला तर पाच तृतीयपंथी मतदार आहेत. यात मतदार संघात एकूण तीन लाख 9 हजार 41 एवढी मतदारसंख्या झाली आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त नऊ हजार 590 एवढी मतदारसंख्या वाढली असून यात तीन हजार 723 पुरूष, तर पाच हजार 867 महिलांचा समावेश आहे.
तर परंडा मतदारसंघामध्ये चार हजार 616 मतदार वाढले आहेत. यात पुरूष दोन हजार 279 तर दोन हजार 334 महिला व तीन तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात आता तीन लाख 23 हजार 923 मतदार झाले आहेत. या चारही मतदारसंघात एकूण 13 लाख 66 हजार 722 मतदार झाले आहेत.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणार्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदार संघात तीन लाख 17 हजार 472 मतदार आहेत. यात एक लाख 717 पुरूष तर एक लाख 52 हजार 718 महिला तसेच 37 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार दोन लाख 90 हजार 251 मतदार आहेत. यात एक लाख 54 हजार 630 पुरूष तर एक लाख 35 हजार 618 महिला व तीन तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
या मतदार यादीमध्ये सर्व मतदारांच्या माहितीचा छायाचित्रांसह नोंदी आहेत. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष यादव यांनी सांगितले.