धाराशिव : अल्पबचत गटाच्या माध्यमातून आपल्या सांसाराला हातभार लावणाऱ्या महिला या जिजाऊंच्या लेकी आहेत, या हिरकणी आहेत.. यांच्या वृत्तीत शक्ती आहे.. या जगात काहीही करू शकतात.. यांना केवळ एक संधी देण्याची गरज आहे.. हेच माझे कर्तव्य आहे अशी भावना राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी हिरकणी महोत्सवात बोलताना व्यक्त केली.
प्रतिवर्षी लेडीज क्लब, धाराशिव आयोजित हिरकणी महोत्सवात हजारो माता-भगिनी, बचत गट उत्स्फूर्त सहभाग घेतात.. यावर्षी झालेल्या महोत्सवात तर ६ दिवसांमध्ये ५० लाखांहून अधिक उलाढाल झाली. आहे.
पुढे बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या, प्रत्येक माता-भगिनीत प्रचंड कौशल्य असून त्यांना केवळ एका संधीची आवश्यकता असते.. या महोत्सवात विक्री करण्यासाठी आलेल्या एका हिरकणीने तर केवळ ६ दिवसात एक लाखांचा व्यवसाय केला.. या ६ दिवसात घरीही न जाता रात्री माल सोडून जावे लागू नये म्हणून स्टॉलमध्येच थंडीत ६ रात्री काढल्या. अशा असंख्य हिरकणींना महोत्सवाच्या निमित्ताने संधी निर्माण झाली.. प्रत्येक महिलेत आई तुळजाभवानी आणि जिजाऊंचा अंश आहे, त्या प्रचंड कर्तृत्व करू शकतात.. त्यांना संधी देणे हे माझे कर्तव्यच आहे!!
दरम्यान, अर्चना पाटील यांनी पाडोळी, नायगाव, वडगाव (शि) आदी गावांमध्ये भेटी देत प्रचार सभा व बैठका घेऊन मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला.. तीर्थक्षेत्र श्री सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केले. अनेक भगिनी आपुलकीने भेटल्या व औक्षण करून सदिच्छा दिल्या..
पाडोळी, नायगाव येथील विकासकामांसाठी जिल्हा परिषद, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमधून आपण भरपूर निधी उपलब्ध करून दिला. यामुळे जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची ग्वाही गावकऱ्यांनी दिली याबद्दल अर्चना पाटील यांनी त्यांचे आभार मानले. तसेच ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे देशहितासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे, भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, पंडितराव टेकाळे, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बावणे, रामहरी शिंदे, दत्तात्रय साळुंके, राजाभाऊ पाटील, शरद पाटील, प्रणव चव्हाण, बाळासाहेब पवार यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..