धारशिव : राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी रांजणी येथे प्रचारसभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले, तसेच अल्पसंख्याक समाजातील महिलांनी पुढे येऊन शुभेच्छा देत “ताई, काळजी करू नका विजय तुमचाच आहे.” असा विश्वास व्यक्त केला..
अर्चना पाटील यांनी प्रचारासाठी मस्सा (खंडे), ईटकुर, डिकसळ, लोहटा (पूर्व) आदी गावांत भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. याप्रसंगी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या, केंद्राकडून निधी खेचून आणण्यासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा महायुतीचाच असायला हवा.. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कार्य आपण विसरता कामा नये. आजही लोकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे. हे केवळ मोदी सरकार मुळेच शक्य आहे. येत्या काळात ते आणखी क्रांतीकारी निर्णय घेणार आहेत. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.
लोकसभा निवडणूक ही देशाचे पंतप्रधान ठरविण्याची निवडणूक आहे. देशाचा विकास कोण चांगला करू शकतो हे आपण सर्वांनी मिळूनच ठरवायचे आहे. ही निवडणूक गल्लीतील अथवा गावातील प्रश्न सोडवण्याची नाही, तर देशाच्या सर्वांगीण विकासाची आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळाला मतदान करावे.. घड्याळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान, घड्याळाला मतदान म्हणजे देशहिताला मतदान..
राज्यात आपले सरकार आल्यावर लोकसभा क्षेत्रातील अनेक मोठी कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे आपल्या महायुतीचा हक्काचा खासदार असेल तरच केंद्रातून मोठ्या प्रमाणात विकास निधी, योजना, मोठे प्रकल्प येऊ शकतात. म्हणूनच मतदार राजाने विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन घड्याळाला मतदान करावे अशी विनंती पाटील यांनी केली.
दरम्यान,गौर,मोहा, खामसवाडी,गोविंदपूर आदी गावांत प्रचार सभा घेऊन मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला. यावेळी माहायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.