Dharashiv : वाशी ता. 7- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या गावभेट कार्यक्रमांतर्गत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा येथे भेट दिली असता तेथील शेतकरी श्री. शिवराज नानाभाऊ नांगरे यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना 10,000/- रुपयांचा चेक देवून निवडणुकीकरीता आर्थीक मदत केली आहे.
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सातत्याने धाराशिव लोकसभा मतदार संघांतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या अडचणीच्या अनुषंगाने लोकसभेमध्ये प्रश्न मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भाने सातत्याने पाठपुरावा केला. तसेच शेतकऱ्यांना एन.डी.आर.एफ/ एस.डी. आर. एफ. दुष्काळाचे अनुदान अतिवृष्टी अनुदान, प्रधानमंत्री पिक विमा, शेतकऱ्यांकरीता रासायनीक खतावरील सबसीडी, सोयाबीन, कांदा, द्राक्षे, ऊस दर आदी प्रश्नांसंदर्भात सातत्याने पाठपुरवा करुन आर्थीक मदत मिळून दिली आहे. यामुळेच सारोळा मां ता. वाशी येथील शेतकरी श्री. शिवराज नानाभाऊ नांगरे यांनी आपल्या शेतीच्या उत्पन्नातून खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना 10000/- रुपये चा चेक देवून आर्थीक मदत केली आहे. आज वाशी तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान सदर चेक खासदार. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याकडे सुपुर्त केला आहे. श्री. शिवराज नानाभाऊ नांगरे यांच्या कार्याचे शिवसेना कार्यकत्यांकडून कौतुक होत आहे.