Osmanabad – Dharashiv
धाराशिव – बिश्र्वभूषण, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी धाराशिव येथील हजरत ख्वाजा शम्सोद्दिन गाजी रहे. यांच्या दर्ग्यासमोर पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टी देण्यात आली.
रविवारी (दि. 7 सायंकाळी झालेल्या या इफ्तार पार्टीस जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, समितीचे अध्यक्ष अॅड. परवेजअहमद काझी, कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे, मुकुंद घुले, अभिजित गिरी, मसूद शेख, दर्ग्याचे सज्जादा शुकुर कुरेशी, सय्यद रफिक, अॅड. वाजीद तसेच इलियास मुजावर, कलीम मुजावर, आरेफ नाईकवाडी, गुड्डू पटेल, इस्माईल पटेल, इलियास अबदार, शेरू पठाण, फारुख (खालेद) हुसेनी, यांची प्रमुख उपस्थिती होती. इफ्तार पार्टीत मुस्लिम बांधवमोठया संख्येने सहभागी झाले होते.
बिश्र्वभूषण, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीत सर्व जातीधर्माच्या नागरिकांचा सहभाग असतो. त्याचबोबर दरवर्षी विविध सामजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे यावर्षी समितीच्या अध्यक्ष पदाचा मान मुस्लिम समाजाला देण्यात आला असून बिश्र्वभूषण, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अॅड. परवेज काझी यांची निवड झालेली आहे.