Dharashiv osmanabad
धाराशिव : तक्रारदार – पुरुष, वय 33 वर्षे , आरोपी -1) नितीन किसन शितापे, वय-40 वर्षे, धंदा-नोकरी, पद-वरिष्ठ तंत्रज्ञ तुळजापुर शहर महावितरण शाखा, जिल्हा-धाराशीव. रा. तुळजाई नगर, तुळजापुर खुर्द रोड, तुळजापुर, जिल्हा धाराशीव.( वर्ग-3). 2) किशोर वसंत हंगरगेकर, वय-60 वर्षे, धंदा-शेती, रा. हंगरगा(तुळ) तालुका-तुळजापुर, जिल्हा-धाराशीव. (खाजगी इसम)
लाच मागणी पडताळणी दि. 06/04/2024 व लाच स्विकारली दि. 06/04/2024 रोजी लाच मागणी रक्कम – 10,000/- रु लाच रकमेची मागणी करुन तडजोडीअंती 5000/-रुपये स्वीकारले लाच स्विकारली रक्कम – 5000/- रुपये (फोन पे द्वारे लाच रक्कम स्वीकारली)
थोडक्यात हकिकत – यातील तक्रारदार हे पीएचएल कंपनीचे साईट सुपरवायझर असुन तक्रारदार यांचे क्रेनचे वाहन चालकाकडुन महावितरणचे हंगरगा येथील ०३ इलेक्ट्रीक पोल व वायर तुटुन नुकसान झाले होते. त्याबाबत तक्रारदार यांचेवर कारवाई न करण्याकरीता तसेच रात्रीचे वेळेस सदरची तुटलेली लाईन जोडून दिली म्हणुन यातील आरोपी यांनी
तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 10,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 5000/- रु. लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य करुन आरोपी क्रमांक ०२ याने फोन पे द्वारे 5000/- लाच रक्कम स्वीकारली असता दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन तुळजापुर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा अधिकारी नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव मो. क्र. 9922207499 , पर्यवेक्षण व सहायक सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव मो. क्र. 9594658686 , मार्गदर्शक – मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर .मो.न. 9923023361 , मा. मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर मो.नं. 98814 60103 ,
सापळा पथकात पोलीस अमलदार सचिन शेवाळे, सिध्देश्वर तावसकर होते.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय 02472 222879
टोल फ्री क्रमांक.1064,