ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आमदार व खासदार यांच्या ग्रहणी मैदानात लोकसभा मतदारसंघात गावभेट दौरा सुरू

Spread the love

Osmanabad – 40 Loksabha election 2024

धाराशिव- उस्मानाबाद ४० लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ दि.०५ एप्रिल २०२४ रोजी संयजोनी ओमप्रकाश राजे निंबाळकर सह शुभांगीताई कैलास घाडगे-पाटील यांनी कळंब तालुक्यातील बाभळगाव परतापूर, उमरा, पानगाव गावास भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या गृहणी यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी गाव भेटी देऊन प्रचार सुरू केले आहे.

महायुती कडून धाराशी लोकसभेसाठी महिला उमेदवार देत नाराशक्तीचा नारा देत आमदार राणाजगजितसिंह सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिल्याने. धाराशिव उस्मानाबाद ४० लोकसभा मतदारसंघातील लढत ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 5 एप्रिल रोजी धाराशिव जिल्ह्यात तामलवाडी टोल नाका येथे अर्चना पाटील यांच्ये जंगी स्वागत करण्यात आले आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अनेक सभांमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये घेतलेल्या मतांपेक्षा एक तरी मत जास्त घेऊन निवडून येईल असा आशा व्यक्त केली होती त्याचप्रमाणे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी देखील मतदार संघात दांडगा संपर्क आहे. व त्याच्या जोरावर मी 101% निवडून येणार असल्याची प्रतिक्रिया देखील अर्चना पाटील यांनी दिली आहे.

दोन्हीही उमेदवार जरी म्हणत असले मी निवडून येतो मात्र जनता कोणाच्या पाठीशी उभी राहिली हे चित्र निकाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटात नाराजीचे चित्र दिसत आहे तर वंचित बहुजन आघाडी व ओबीसी पक्ष देखील या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार आहेत. या मतदारसंघांमध्ये काहीजण अपक्ष उमेदवार देखील उभे राहणार आहेत. अपक्ष उमेदवाराची लॉटरी देखील लागू शकते किंवा जास्त मतदान घेणाऱ्या उमेदवाराचे गणित देखील बिघडू शकतात.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!