ओबीसी बहुजन पार्टीची लोकसभेच्या अनुषंगाने बैठक संपन्न , इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

Spread the love

Dharashiv : ( osmanabad 40- loksabha election )

धाराशिव : ओबीसी बहुजन पार्टीच्या ( OBC bhojan party )  वतीने धाराशिव लोकसभेसाठी उमेदवार देण्यात येणार आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि ३० मार्च रोजी जत्रा फंक्शन हॉल या ठिकाणी बैठक संपन्न झाली आहे. 

बैठकीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. अर्जुन सलगर, डॉ. घुले, अरुण जाधवर , हरिदास शिंदे, दिलीप म्हेत्रे, बप्पा कोरे, यांनी लोकसभेसाठी मुलाखत दिली आहे. 

यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे यांनी पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार ही बैठक व मुलाखती घेतल्या असून इच्छुक उमेदवारांची सर्व माहिती पक्षाच्या वरिष्ठापर्यंत पोचविणार आहेत. पक्षांच्या वरिष्ठांनी ठरविलेल्या उमेदवारांचे सगळ्यांनी मिळून काम करायचे असे देखील बैठकीत एक मत झाले आहे. अशी माहिती सचिन शेंडगे यांनी दिली आहे.

या बैठकीसाठी दिपक जाधव, उमेश मोराडे , उमाकांत सानप , मच्छिंद्र सारुख, सोमनाथ गुडे, प्रमोद दाणे , अप्पासाहेब पाटील, मनोज खरे , ज्ञानेश्वर पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!