अडल्ट बीसीजी ( BCG ) लसीकरण मोहीम मे,जून आणि जुलै महिन्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरणासाठी बीसीजी लसीकरण मोहीम

Spread the love

लसीकरणासाठी पूर्व नोंदणी करा सीईओ डॉ.मैनक घोष यांचे आवाहन

Dharashiv :

धाराशिव दि.३० ( antarsawad news) राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित केले आहे.क्षयरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून TB preventive therapy (TPT) क्षयरोग प्रतिबंधात्मक औषधी देण्यात येत आहे.तसेच एबीसीजी मोहीम केंद्र शासनाच्या आदेशाने जिल्ह्यात प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष अडल्ट बीसीजी लसीकरण मोहीम माहे मे,जून,जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये पात्र लाभार्थी शोधण्याकरिता आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत एप्रिल महिन्यात ग्रामीण व शहरी भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.या सर्वेक्षणातून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार होणार आहे.


अडल्ट बीसीजी लसीकरणासाठी मागील पाच वर्षातील सर्व क्षयरुग्ण गरोदर माता /स्तनदा माता,मागील तीन वर्षातील क्षयरुग्णाचे सहवासीत, सद्यस्थितीत क्षयरोगाचे उपचार घेत असलेले/ क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार (TPT) घेत असलेले,६० वर्षावरील सर्व एचआयव्ही/ कर्करोग्रस्त /अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती,मधुमेह रुग्ण गंभीर आजार / दुर्धर आजार असलेले व्यक्ती,धुम्रपान करणारे, मागील तीन महिन्यात रक्त चढवलेले व्यक्ती,बॉडी मास इंडेक्स (BMI) १८ पेक्षा कमी बीसीजी वा इतर कोणत्याही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झालेल्या व्यक्ती व
जोखीमयुक्त वर्तन असणाऱ्या व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे.
पात्र यादीनुसार मे महिन्यात प्रत्यक्ष लसीकरण होणार आहे.हे लसीकरण सर्व प्रशिक्षित लस टोचक (व्हॅसिनेटर) यांच्याद्वारे नियमित लसीकरण सत्राचे दिवस वगळून या लसीकरणाचे नियोजन होणार आहे. तसेच जून व जुलै महिन्यात वंचित लाभार्थ्यांना लसीकरण दिले जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरीदास व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ इस्माईल मुल्ला यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम यशस्वी करण्याकरिता जिल्हास्तरीय अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.


तरी घरोघरी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे व जोखिम गटातील अठरा वर्षावरील नागरिकांनी लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांकडे पूर्व नोंदणी करून घ्यावी.असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!