Dharashiv :
धाराशिव शहर पोलीस ठाणे : पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे दि. 25.03.2024 रोजी जिवे मारण्याचा प्रयत्न व हिंदु मुस्लीम जातीय दंगलीचा गंभीर गुन्हा दाखल असलेल्याने गुन्ह्याचे घटनास्थळ पंचनामा व जप्ती पंचनामा करणे कामी दोन शासकीय पंच उपलबध् करुन देणे बाबत मुलत: असे कर्मचारी पुरविण्याबाबत तरतुद नसल्याचे पत्र देवून शासकीय पंच पुरविले नाही.
गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व शासनाचे आदेश असताना सुध्दा यातील आरोपी नामे- सहा. आयुक्त श्री. बी.जी. अरवत समाज कल्याण कार्यालय धाराशिव यांनी शासकीय पंच पुरविले नाही. व मा. जिल्हाधिकारी सो यांचे आदेशाचे अवमान करुन उल्लघंन केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे दिनेश उत्तमराव जाधव सपोनि पोलीस ठाणे धाराशिव यांनी दि.28.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे 188, 187 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अशी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.