धाराशिव,दि.२३ ( antarsawad news ) दरवर्षी राज्यात सर्व शहर,प्रभाग व ग्रामीण क्षेत्राचे वार्षिक मुल्यदरात (रेडीरेकनर) १ एप्रिलपासून वार्षिक मुल्य दर तक्त्यामध्ये दरवर्षी बदल होत असतात.यावर्षीही या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या आर्थिक वर्षात वार्षिक मुल्य दर तक्त्यामध्ये बदल अपेक्षित आहेत. तरी नागरिकांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मुल्यदराचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीसाठी गर्दी होणार आहे. त्याअनुषंगाने मार्च महिन्यातील २३, २४ व २९ ते ३१ मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये वरिष्ठांच्या आदेशान्वये सुरु राहणार असल्याचे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आर.जी.जानकर यांनी कळविले आहे