गोवंशीय जनावरांची कत्तलीकरीता वाहतुक करणाऱ्या विरुध्द परंडा पोलीसठाण्याची कारवाई

Spread the love

धाराशिव  : दिनांक 21.03.2024 रोजी 22.00 वा. सु. परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक किरण घोंगडे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, परंडा येथील दर्गा रोड येथुन भिमनगर कडे जाणारे रोडवर एक पिकअप  वाहन उभे आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन परंडा पोलीस ठाण्याचे पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून चेक केले असता सदरील वाहनांमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करण्यात येत असल्याचे दिसून आले. सदरील वाहनाचे निरीक्षण केले असता वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने गोवंशीय जनावरे भरले असल्याचे निदर्शनास आले. नमुद पिकअप मधील 16 वासरे असा एकुण 48,000 ₹ किंमतीचे गोवंशीय वासरे सह पिकअप वाहन असा एकुण 5,00,000 ₹ किंमतीचे जनावरे व वाहन मिळून आले. सदरील वासरांना वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने भरण्यात आले होते. या वासरांना गाडीमध्ये हालचाल करण्यासाठी पर्याप्त जागा नव्हती. अत्यंत त्रासदायक पध्दतीने त्यांची वाहतुक करण्यात येत होती. त्यावरुन पोलीस ठाणे परंडा येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 62/2024 प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम  कलम 11(ए)(डी) (ई) (एच), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(अ), 6, 9, 9(अ) अन्वये गुन्हा नोदंवला आहे.

        सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक   विनोद इज्जपवार, पोलीस उप निरीक्षक श्री. घोंगडे, पोलीस हावलदार शेख, महिला पोलीस हावलदार पायाळे, पोलीस नाईक गुंडाळे, पोलीस अंमलदार- सुर्यजीत जगदाळे, गायकवाड यांचे पथकांनी केली आहे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!