धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी खुन गुन्हे दाखल
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)सुग्रीव किसन मेंढे, वय 40 वर्षे, 2) ज्ञानेश्वर अरुण मोरे, वय 38 वर्षे, 3) सचिन काशिनाथ यादव, वय 42 वर्षे, 4) सुजित नानासाहेब निंबाळकर, वय 38 वर्षे, सर्व रा सांजा, 5) राहुल अनिल साळुंके, वय 25 वर्षे, रा. चिखली ता.जि. धाराशिव व इतर 20 अनोळखी इसम यांनी दि. 18.03.2024 रोजी 07.00 वा. सु. सांजा गावात मयत नामे- अशोक जनार्धन शिंदे, वय 25 वर्षे, रा. खंडाळा ता. जि. लातुर ह.मु. ज्ञानेश्वर मंदीराच्या पाठीमागे ज्ञानेश्वर नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांना ट्रॅक्टर चोरीच्या संशयावरुन चाबकाने, लाकडी काठीने, लोखंडी पाईपाने मारहाण करुन जिवे ठार मारले. तसेच अशोक शिंदे यांचा मित्र अजय झाडके यांना पण जिवे मारण्याच्या उद्देशाने चाबकाने, काठीने, लोखंडी पाईपने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी फिर्यादी नामे- सरिता अशोक शिंदे, वय 23 वर्षे, रा. खंडाळा ता.जि.लातुर ह.मु. ज्ञानेश्वर मंदीराच्या पठीमागे ज्ञानेश्वर नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.18.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 302, 307, 326, 323, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)रोहीत सुभाष राठोड रा. शास्त्रीनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 17.03.2024 रोजी 23.00 वा. सु. उमरगा येथील विश्व बार समोरील पानटपरीजवळ मयत नामे- पुरुषोत्तम उर्फ सुनिल मनोहर राखेलकर, वय 58 वर्षे, रा. राम मंदीर समोर बालाजी नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना शाब्दीक बाचाबाचीतुन राग आल्याने नमुद आरोपीने जमीनीवर खाली ढकलून हाताचापटाने लाथाबुक्यांनी मारहाण करुन ढोके जमीनीवर व बादलीवर आपटून जिवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत घटनास्थळावरुन ओढत नेवून बंजारा धाब्याजवळ झुडपाखाली टाकुन दिले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ फिर्यादी नामे- पांडुरंग मनोहर राखेलकर, वय 60 वर्षे, रा. राम मंदीर समोर बालाजी नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.18.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 302, 201 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.