शिवसेना धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुखपदी अनिल खोचरे

Spread the love

धाराशिव, दि. १९ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले जुने शिवसैनिक तथा माजी जिल्हा प्रमुख अनिल खोचरे यांची शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे सचिव संजयजी मोरे यांनी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून अनिल खोचरे यांची सोमवारी मुंबई येथे निवड करण्यात आली आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून अनिल खोचरे यांची जाहीर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील बाळासाहेब भवनात पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी नियुक्ती पत्र देऊन खोचरे यांना वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण अधिक जोरकसपणे पुढे घेऊन जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब, संपर्क नेते अनंतजी जाधव, आमदार मनीषा कायंदे, जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, सूरज साळूके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवहर स्वामी, राहुल डोके आदींची उपस्थिती होती.

खोचरे यांच्यामुळे धाराशिव आणि परिसरातील शिवसेना पक्षाचा प्रचार आणि प्रसार अधिक व्यापक आणि बळकट होईल अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी आपण कटिबद्ध असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील जुन्या-नव्या अश्या सर्व शिवसैनिक व सर्वसामान्य नागरिकांना सोबत व विश्वासात घेऊन काम करणार असल्याची ग्वाही श्री खोचरे यांनी यावेळी दिली. अनिल खोचरे यांच्या या आनंददायी निवडीबद्दल लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह जिल्हाभरातील शिवसैनिकांनी खोचरे यांचे अभिनंदन केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!