धाराशिव : तक्रारदार – पुरुष, वय 38 वर्षे , आरोपी -1)संजय भीमराव गडकर, वय-51 वर्षे, धंदा-नोकरी, पद-कनिष्ठ लिपीक प्रभारी दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालय, वाशी, जिल्हा-धाराशीव. ( वर्ग-3).
लाच मागणी पडताळणी:-
दि. 19/03/2024 , लाच स्विकारली – दि. 19/03/2024 ,लाचेची मागणी रक्कम – 10,000/- रु लाच स्विकारली रक्कम -10,000/- रु
थोडक्यात हकिकत
यातील तक्रारदार हे वकिल असुन ते बॅांड रायटर म्हणुन काम करतात. तक्रारदार यांचे अशील यांचे कडकनाथवाडी, तालुका वाशी येथील 02 ठिकाणच्या जमिनीचे खरेदीखत करुन दस्त नोंदणी करुन देण्यासाठी आलोसे संजय भीमराव गडकर, वय-51 वर्षे, धंदा-नोकरी, पद-कनिष्ठ लिपीक प्रभारी दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालय, वाशी, जिल्हा-धाराशीव याने तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 02 दस्तचे प्रत्येकी 5000/- रुपये प्रमाणे एकुण 10,000/- रुपये लाचेची मागणी करून 10,000/- रु. लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन वाशी, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. अशी माहिती धाराशिव लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव मो. क्र. 9594658686
मार्गदर्शक – मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर .मो.न. 9923023361
मा. मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर मो.नं. 98814 60103
सापळा पथक – पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय 02472 222879
टोल फ्री क्रमांक.1064