धाराशिव : अपघातग्रस्तांना मदत करा असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले होते या आवाहनाला धाराशिव वाहतूक पोलीस प्रतिसाद दिला आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा मदत करणार्यांना कोणतेही अडचण येणार नाही असे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले आहे. अपघातग्रस्तांना तातडीने सर्वांनी मदत करावी.
आज दि १८ मार्च रोजी धाराशिव शहरात राजधानी हॉटेल समोर अपघात झाला व अपघाती व्यक्तीस वाहतूक पोलीस लक्ष्मीकांत घादगिने यांनी जखमीस उपचारा करिता सरकारी दवाखाना येथे घेऊन गेले. सोबत सह कर्मचारी लक्ष्मण शिंदे व सचिन शेळके नेमणूक वाहतूक शाखा धाराशिव हे उपस्थित होते. वाहतूक पोलीसांच्या वतीने आवाहान करण्यात आले आहे की जिथे आपण असो अपघात झालेला आढळून येईल तेथील जखमींना आपण जवळच्या दवाखान्यात घेऊन जाऊन मदत करावी. आपल्या मदतीने एखाद्याचे प्राण वाचले जातील. अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहान वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.