तुळजापूर (दि.13) – तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बसवंतवाडी येथील प्राथमिक शिक्षक सुसेन बळीराम सुरवसे यांना गट शिक्षण कार्यालय, पंचायत समिती, तुळजापूर च्या वतीने 2022-23 या शैक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचा प्रतिवर्षी या पुरस्काराने सन्मान केला जातो. यावर्षी येवती केंद्रातून उपक्रमशील शिक्षक म्हणून सुसेन बळीराम सुरवसे यांची निवड करण्यात आली. आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते त्यांना त्यांचे वडील- बळीराम सुरवसे, आई – सुकुमार सुरवसे, पत्नी – सुनीता सुरवसे, मुलगी – अनुष्का सुरवसे व मुलगा – श्रेयश सुरवसे यांच्यासह सन्मानित करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, गटशिक्षणाधिकारी मेहरूनिसा इनामदार, विस्तार अधिकारी डॉ.वाय.के. चव्हाण, अर्जुन जाधव, तात्यासाहेब माळी उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल शिक्षक सुरवसे यांचे मंगरूळ बीट चे विस्तार अधिकारी मल्हारी माने, बसवंतवाडी चे सरपंच नागेश बनसोडे, येवतीचे केंद्रप्रमुख अनंत हाके, माजी केंद्रप्रमुख विठ्ठल गायकवाड, नांदुरी केंद्रप्रमुख संजय वाले, अपसिंगा केंद्रप्रमुख मोहन भोसले, तीर्थ केंद्रप्रमुख तानाजी महाजन, मसला खुर्द शाळेतील पदवीधर शिक्षक मारुती काळे, शाळेचे मुख्याध्यापक ऋषिकांत भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र पारवे, उपाध्यक्ष बाळू भोसले यांच्यासह समिती सदस्य व पालक, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी कल्याण (बापू बेताळे), प्रशांत मिटकर, पवन सूर्यवंशी, विशाल अंधारे, सुखदेव भालेकर, सचिन राऊत, सुरेश राऊत तसेच शिक्षकमित्र बापूराव मोरे, सदाशिव शिंदे, संतोष माडजे, अंबादास मैंदर्गी, उमेश सुर्वे, श्रीमंत टेंगळे, प्रमोद चौधरी, दीपक ढोणे, राजकुमार घोडके, काकासाहेब सूर्यवंशी, धोंडिबा गारोळे, तुकाराम वाडकर, बाळासाहेब घेवारे, केशव काळे, बालासाहेब चिवडे, ज्योतिर्लिंग क्षीरसागर, अजित माळी, अतुल माळी, शांताराम कुंभार, विनोद स्वामी, रामचंद्र शिंदे, गोरख माळी, सहदेव माळी, परमेश्वर माळी, राहुल जाधव यांच्यासह तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने कौतुक करण्यात आले.