धाराशिव –
धाराशिव नगर परिषदअंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील बाळासाहेब ठाकरे नगर, शाहू नगर, अष्टविनायक चौक ते सुलतानपुरा, शिरीन कॉलनी, गालिब नगर, रजा कॉलनी यांना जोडणारा मुख्य डीपी रोड तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा धाराशिव – कळंब विधानसभा मदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. कैलास (दादा) पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.11) करण्यात आला. या प्रभागात 2 कोटी 18 लाख रुपये खर्चाच्या एकूण पाच कामंना मंजुरी मिळालेली असून कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 2021-2 2 अंतर्गत विविध विकास कामांना मंजुरी मिळालेली आहे. सोमवारी सकाळी या विकास कामांचा आमदार कैलास पाटील व प्रभागातील ज्येठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 2021-2 2 अंतर्गत विविध विकास कामांना मंजुरी मिळालेली आहे. सोमवारी सकाळी या विकास कामांचा आमदार कैलास पाटील व प्रभागातील ज्येठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार कैलास पाटील यांनी, सदरील कामे दर्जेदार व्हावीत यासाठी प्रशांत बापू साळुंके यांनी स्वतः लक्ष द्यावे असे सांगून संबंधित ठेकेदारांनीही कामाचा दर्जा योग्य पद्धतीने राखला जाईल याची दक्षता घ्यावी असेही ते म्हणाले. तर प्रभागातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशांत बापू साळुंके यांनी खासदार व आमदारांचे आभार व्यक्त केले.
यावेळी विक्रम भैय्या पाटील, पंकज पाटील, दिनेश बंडगर, मनोज पडवळ, भागवत गोरे बप्पा, अजित बाकले, युवराज राठोड, नाना सुरते, श्री. भिसे गुरुजी, विलास सुरते, अविनाश चव्हाण, विजयकुमार सर्जे, दत्ता सोकांडे, साईराज कदम, विकास जाधव, राजाभाऊ ढवळे, गोपीनाथ चव्हाण, अनिकेत कोळगे, संदेश जाधव, अजित बाकले, अजित शिंदे, पिंटू डावखरे, सचिन सर्जे, श्री. कांबळे, श्री. बनसोडे, श्री. चव्हाण, बंटी जगताप यांच्यासह प्रभागातील विविध मान्यवर नागरिक, महिला उपस्थित होत्या.