‘देवेंद्र’ने लिहले ‘देवाधीदेव’
महादेवावरील गाण्याची सोशल मिडीयावर चर्चा.
राजकारणातील दिग्दर्शक झाला गीतकार
राज्याचे चाण्यक म्हणून ख्याती असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या व्यक्तीमत्वाचा एक नवा आगळा वेगळा आयाम समोर आला आहे. ऐरवी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या गाण्यांसाठी चर्चेत असतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अमृता फडणवीस आणि शंकर महादेवन यांनी गायलेले‘देवाधी देवा’ गाणे रिलीज झाले खरे मात्र चर्चा सुरू झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्या गीतकार असल्याची. देवाधीदेवा या गाण्याचे बोल देवेंद्र फडणवीसांनी लिहले आहेत. यामुळे ऐरवी महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील ‘डिरेक्टर’ असलेले देवेंद्र फडणवीस आता गीतकार झाले आहेत. त्यामुळे सोशल मिडीया ते राजकारण यावर चांगलीच चर्चा रंगलीये.
महाकाल देवाधीदेव शंकर म्हणजे हिंदूच्या आस्थेचा व श्रद्धेचा विषय आहे. महाशिवरात्रीला हिंदू सणांमधे मोठे महत्व आहे.
‘देवाधी देव’ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले महादेवावर गाणे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रिलीज आहे. याची माहिती स्वतः ट्विट करुन देवेंद्र फडणवीसांनी दिली
गाण्याची युट्युब लिंक