जबरी चोरीतील फिर्यादीच निघाला आरोपी गुन्हेशाखेची कारवाई

Spread the love

धाराशिव ( प्रतिनिधी)

स्थानिक गुन्हे शाखा- फिर्यादी नामे-सिताराम उर्फ सिध्दराम रामचंद्र जेरबंडे, वय 32 वर्षे, रा. विजापूर रोड आम्रपाली चौक, सोलापूर यांच्या ट्रॅक मधील रोख रक्कम 1,50,000₹ हे दि. 05.03.2024 रोजी रात्री   ढोकी रस्त्यावर रेल्वे फाटकाच्या पुढो अज्ञात तीन व्यक्तीने जबरीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सिताराम जेरबंडे  यांनी दि.06.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे  गुरनं 95/2024 कलम 392, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.



गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे यांचे आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावून सदर गुन्ह्यातील फिर्यादी सिताराम उर्फ सिध्दराम रामचंद जेरबंडे, वय 32 वर्षे, रा. विजापूर रोड आम्रपाली चौक, सोलापूर यांच्या कडे सखोल चौकशी केली असता सदर घटने बाबत यातील फिर्यादी याच्यावर संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमत: पोलीसंना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सागिंतले की माझ्या मनात लालच निर्माण झाली मला लोकांचे  उसने पैसे देणे असल्याने मी माझेजवळील मालकाचे पैसे झाल्याचा बनाव रचून ते पैसे हडपण्याचा बेत आखून माझा मित्र नामे- हैदर मुजावर रा. सलगर वस्ती, झोपडपट्टी नं 02 सोलापूर यास बोलावून घेवून सदरचा गुन्हा मी व माझा मित्र यांनी केला असल्याची कबुली दिली  तसेच पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेला माल 1,50,000 ₹ रोख रक्कम हस्तगत केला. नमुद आरोपीस चोरीच्या मालासह ढोकी पोलीसांच्या ताब्यात दिले.



            सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व  गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली  सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक  अमोल मोरे,  सचिन खटके , पोलीस हावलदार- विनोद जानराव, समाधान वाघमारे, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक मुजीब पठाण, आरब, अशोक कदम, सुनिल मोरे यांच्या पथकाने केली आहे.  अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!