जबरी चोरी, घरफोडी, व ATM चोरी मधील आरोपींना कळंब पोलीसांच्या ताब्यात

Spread the love

 धाराशिव :

1)पोलीस ठाणे कळंब हद्दीत दिनांक 30.08.2023 रोजी कळंब शहरातील SBI बॅकेचे ATM घेवून जावून त्यामधील एकुण 3316500 ₹ अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले होते या बाबत फिर्यादी नामे अभय बाळासाहेब साळुंखे रा. लातुर यांनी दिलल्या फिर्याद वरुन पोलीस ठाणे कळंब येथे गुरुन 392/2023 कलम 461, 380 भादवि  प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यावरुन गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषण च्या आधारे एकुण 05 आरोपी निष्पन्न केले आहेत त्यापैकी आरोपी नामे राजपासिंग अजयसिंग बादा, 2) आकाशसिंग गोखे दोघे रा. सिंदखेडराजा जि. बुलढाणा यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यामध्ये ATM चे पार्ट व इतर साहित्य व रोख  35,000₹  जप्त करण्यात आलेले आहे.

 2) तसेच दि. 28.1.2024 रोजी कळंब ते येरमाळा जाणारे रोडवर असलेले राजश्री पेट्रोल पंपामध्ये 04 इसमांनी मोटार सायकलवर येवून पंपवारील कामकरणाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून काउंटरमधील 3,28,808₹ चोरुन नेले. म्हणून फिर्यादी नामे विजय भारत वाघमारे रा. बाभळगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दिलेलृया फिर्यादी वरुन गुरनु 36/2024 कलम 392, 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे.  सदर गुन्ह्याच्या तपासात गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषण च्या आधारे एकुण 05 आरोपी निष्पन्न केले आहेत 1) विकास सुभाष सावंत, वय 27 वर्ष्ज्ञे रा. सावंतवाडी ता. केज जि. बीड, 2) अजय अशोक तांदळे वय 23 वर्षे, रा. कोरेगाव ता. केज जि. बीड, 3) बालाजी राम लांब, वय 19 वर्षे, रा. कोरेगाव ता. केज जि. बिड, 4) सोमनाथ राजाभाउ चाळक, वय 22 वर्षे, रा. लव्हुरी ता. केज जि. बीड यांना अटक करुन त्यांचेकडून गुन्ह्यातील गेला माला पैकी,  रोख 10,300₹ गुन्ह्यात वापरलेले हत्यार व कपडे हस्तगत करण्यात आलेले आहेत.

3) तसेच दि. 02.02.2024 रोजी रात्री 21.00 ते दि. 03.02.2024 रोजी सकाळी 06.00 वा. चे दरमृयान माउली टायर्स दुकान, परळी रोड, भेजराज हॉटेल शेजारी लोंढा ट्रेडर्स दुकानातुन परळी बायपास रोड कळंब, राजमंगल बिल्डींग मटेरिल ॲन्ड हार्डवेअर दुकानातुन परळी रोड, भोजराज हॉटेल शेजारी, कळंब ता. धाराशिव येथे दुकानात प्रवेश करुन दुकानातुन एकुण 1,60,000₹ रोख रक्कम चोरुन नेली म्हाणून फिर्यादी नामे- निखील नितीन पवार रा. करंजकल्ला ता. कळंब ज. धाराशिव यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन पोलीस ठाणे कळंब येथे गुरु 51/2024 कलम 457, 380 भदवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा तपासा दरम्यान गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषण च्या आधारे  तसेच पोलीस ठाणे बार्शी ग्रामीण जि. सोलापूर यांचे मदतीने आरोपी नामे 1) करतारसिंग अचलसिंग दुधानी, वय 24 वर्ष्ज्ञे रा. शिवाजी चौक, परळी ता. परळी जि. बीड, 2) अक्षय पोपटराव पाडोळे, वय 29 वर्षे रा. जुना महाडा कॉलनी, विमान नगर पुणे जि. पुणे, 3) हमीद महेबुब शेख रा रामटेक पुणे, 4) जगजीतसिंग आचीलसिंग दुधानी रा. परळी जि. बीड यांना अटक करुन त्यांचेकडून  गुन्ह्यातील गेल्या माला पैकी एकुण 10,100 ₹ रोख हस्तगत करण्यात आले आहे.

 4) तसेच दि. 16.02.2024 रोजी समर्थ पेट्रोलपंप मस्सा(खं) येथे अज्ञात मोटार सायकल धाराकांनी शस्त्राचा धाक दाखवून पेट्रोल पंपाचे काउंटर मधील एकुण 70,000₹ चोरुन लेले आहे. यावरुन फिर्यादी नामे- रामराज सुभाष ढेपे रा. लाखनगाव ता. वाशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल आहे. तसेच गोपनिय माहिती व तांत्रिक विशलेषण च्या आधारे एकुण 05 आरोपी निष्पन्न केले आहेत. 1) विकास सुभाष सावंत, वय 27 वर्ष्ज्ञे रा. सावंतवाडी ता. केज जि. बीड, 2) अजय अशोक तांदळे वय 23 वर्षे, रा. कोरेगाव ता. केज जि. बीड, 3) बालाजी राम लांब, वय 19 वर्षे, रा. कोरेगाव ता. केज जि. बिड, 4) सोमनाथ राजाभाउ चाळक, वय 22 वर्षे, रा. लव्हुरी ता. केज जि. बीड हे असल्याचे निष्पन्न झालेले आहे तसेच सदर आरोपीवर महाराष्ट्रात विविध पोलीस स्टेशनला विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत.

 

            सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व गौहर हसन, उप विभागीय पोलीस अधिकारी  संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस ठाणेचे  पोलीस निरीक्षक रवि सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक  हनुमंत कांबळे, महिला सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, पोलीस उप निरीक्षक रामहारी चाटे, पोलीस हावलदार-गणेश वाघमोडे, पोलीस नाईक दत्तात्रय शिंदे, शिवाजी राऊत, अजिज शेख पोलीस अमंलदार फत्तेपुरे, दिगंबर अंजान, सुनिल तारळकर, सुरज पाचाळ, सुरज गायकवाड, नवनाथ खांडेकर  यांच्या पथकाने केली आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!