धाराशिव – धाराशिव (उस्मानाबाद)शहरातील अकबर पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अकबर गुलाबखान पठाण यांचा व एम आय एम पक्षाचा कसलाही संबंध नाही काही वर्षांपूर्वीच त्यांनी पक्ष सोडला आहे.
अशी माहिती एम आय एम आय एम ( ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुस्तफा खान यांनी दिली आहे. ते पक्षात नव्हते व त्यांचा पक्षाशी काही संबंध नव्हता व अकबर पठाण यांचाबरोबर एम आय एमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही. काही लोकांकडून पक्षाची बदनामी करण्याच्या हेतू सोशल मीडियावर व प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे काम करण्यात येत आहे अशी देखील प्रतिक्रिया प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा अध्यक्ष मुस्तफा खान पठाण यांनी दिली आहे.